भावी डॉक्टर धनंजय अनंत काळे यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतरही धनंजय यांनी सहा रुग्णांना जीवनदान देत माणुसकीचा उच्च आदर्श समाजासमोर ठेवला आहे. गुरुवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबीयांच्या पुढाकारातून त्यांचे अवयवदान करण्यात आले असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जालना ते पुणे दरम्यान विशेष ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आले. परभणी येथील रहिवासी असून तो जालना वैद्यकीय शिक्षण घेत होता.