कळमेश्वर: केतापार येथील ब्लिंकिट कंपनीत शिवसेनेचे मंगेश गमे यांनी जाणून घेतल्या कामगारांच्या समस्या
आज दिनांक 15 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता कळमेश्वर येथील ब्लिंकिट कंपनीत शिवसेनेचे मंगेश गमे यांनी कामगाराची समस्या जाणून घेतल्या. सुरक्षा रक्षक यांनी अनुराग लोणारे या तरुणावर विनाकारण हात उचलून जबरदस्तीने नाहरकत पत्र लिहून घेतल्याची गंभीर घटना घडली. अन्यायग्रस्त तरुण न्यायाच्या शोधात सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे शिवसेना यांच्या संपर्कात आले व शिवसेनेचे मंगेश गमे यांनी त्यांना न्याय मिळवून दिला