नाशिकरोड पोलीस ठाण्यात 28 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकलहरे शिवारातील गट नं. 403 मध्ये केवळ 12 रो-हाऊस बांधण्याची परवानगी असताना आरोपींनी फिर्यादीस खोटा प्लॅन दाखवून रो-हाऊस नं. 22 विकल्याचे समोर आले. फिर्यादीकडून 28 लाख रुपये घेतल्यानंतर कोणतेही रो-हाऊस न देता फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली. नाशिकरोड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोनि नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.