रावेर: नागलवाडी येथून २३ वर्षीय तरुण झाला बेपत्ता, सर्वत्र शोध घेऊनही तरुण मिळून न आल्याने चोपडा शहर पोलीसात हरवल्याची तक्रार
Raver, Jalgaon | Nov 16, 2025 नागलवाडी या गावात चंद्रकांत गजानन पाटील वय २३ हा तरुण आपल्या कुटुंबासह आपल्या घरी होता. दरम्यान हा तरुण आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही. सर्वत्र शोध घेऊनही तरुण कुठेच मिळून न आल्याने चोपडा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.