नागपूर ग्रामीण: दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर नागपुरात हाय अलर्ट, ग्रामीण पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमालयात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात तात्काळ हाय अलर्ट जारी झाला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ग्रामीण पोलीस दलाने सुरक्षा व्यवस्था कडक केली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिली आहे