सहकार महर्षी, माजी आमदार लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब घुईखेडकर यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त दिनांक १० जानेवारीला शहरातील मुंगसाजी महाराज महाविद्यालय, अभ्यासा इंग्लिश मिडियम स्कूल व स्वर्गीय बाळासाहेब फाउंडेशन, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.