भोकरदन: राजुर भोकरदन मुख्य रोडवर राजुर गावाजवळ महेश हॉटेल समोर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात ,दुचाकीस्वार महिला ठार
आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील राजुर ते भोकरदन या मुख्य रोडवर महेश हॉटेल समोर ट्रकचा उद्याचाकीचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील असलेल्या तीन जणांपैकी महिला गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावली आहे,मयत महिलेचे नाव लक्ष्मीबाई रंजीत गोफणे असे असून त्या राजुर गणपती रायाच दर्शन करून ताडकळस गावी जात होत्या, हा अपघात काल 20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 च्या सुमारास झाला आहे.