प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकावर वीरगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवार ता.25 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कनसागज ते टाकळीसागज जाणाऱ्या रोडवर कनकसागज शिवारात करण्यात आली आहे.या कारवाई मध्ये पोलिसांच्या पथकाने दुचाकी व सुगंधित तंबाखू गुटखा असा एकूण 73 हजार 933 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या प्रकरणात शुक्रवार ता.26 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.