जालना: जालना शहरातील सर्व बँकांना पीएम स्वनिधी कर्ज वाटपाचे आदेश त्वरित देण्यात यावे - सुशील वाघमारे यांची मागणी
Jalna, Jalna | Oct 29, 2025 जालना शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांना पीएम स्वनिधीचे कर्ज वाटप करण्याचे आदेश त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी रिपब्लिकन बहुजन सेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच जालना महानगरपालिकेच्या पथविक्रेता समिती सदस्य सुशील वाघमारे यांनी बुधवार दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता केली आहे. या संदर्भात त्यांनी जालना शहर महानगरपाकेच्या आयुक्तांना निवेदनही दिले आहे. जालना शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांना पीएम स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज वितरण तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली.