संगमनेर: प्रवरा नदीपात्रातून अनोळखी पुरुषाचा मृतदेह; परिसरात खळबळ
प्रवरा नदीपात्रातून अनोळखी पुरुषाचा मृतदेह; परिसरात खळबळ अहिल्यानगर : प्रवरा नदीपात्रातील गंगामाई घाट परिसरात सोमवारी (15 सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेमुळे शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्ष असून अंगावर लाल-निळसर पट्ट्यांचा छोट्या चौकटीचा फुलशर्ट, काळी पॅन्ट व काळ्या रंगाची अंडरवेअर असल्याचे पोलिसांनी सांगितले.