अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार दारे श्रीमद पावन प्रज्ञा पुराण कथा व पंचकुंडी गायत्री महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन दुर्गा मंदिर चौक ग्राम सिलेगाव येथे दि.8 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. आज दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी दहा ते दोन वाजेच्या दरम्यान गावातून मंगल कलश यात्रा काढण्यात आली व त्यानंतर ग्रामदेवता पूजन करण्यात आले. तर सायंकाळी सात वाजता प्रज्ञापुराण कथा प्रारंभ करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येत गावातील गणमान्य नागरिक भाविक भक्तगण उपस्थित होते.