आज दि.16 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी रात्री 8वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आ. चंद्रकांत पाटील दानवे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे की भोकरदन नगरपरिषद निवडणुकीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गट हा स्वातंत्र्य लढणार आहे कारण त्यांचा मित्र पक्ष काँग्रेस हा युती करायला तयार नाही खासदार डॉक्टर कल्याणराव काळे व जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सुद्धा युतीचे काही संकेत दिलेले नाही त्यामुळे आम्ही स्वातंत्र लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.