मोहाडी: सोनेगाव परिसरात वाघाची दहशत, शेतकऱ्यांत व पशुपालकांत भीतीचे वातावरण
शेतकऱ्यांची धानपीक कापणीला आले असता शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होत आहे. तर दि. 28 नोव्हेंबरच्या सायंकाळी सोनेगाव येथे वाघाने एका गायीची व वासराची शिकार केली. सोनेगाव परिसरात गत चार ते पाच दिवसांपासून वाघाने दहशत माजविला असून शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वन विभागाकडून शेतकऱ्यांनी एकटे न जाण्याचा सूचना देण्यात आल्याची माहिती वन वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी दिली आहे.