तालुक्यातील कापूसवाडगाव शिवारातील 2 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुनंदा बाबासाहेब लबडे यांची कापूसवाडगाव शिवारात गट क्रमांक 197 मधील शेती याचे यामध्ये त्यांनी 4 एकर ऊस लागवड केली होती,दरम्यान शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली दरम्यान बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले.दरम्यान या घटने 2 एकर ऊस जळून खाक झाला.