कळमनूरी: पारावरती येऊन बेंडकुळ्या काढणारा तुमचा आमदार येऊन बसला पाहिजे -शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आ .संतोष बांगरावर टिका
मी जसा आज पारावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे असंच पारावर मुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे,पारावरती येऊन तुमचा बेंडकुळ्या काढणारा आमदार येऊन बसला पाहिजे,डोंगरकडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आ. संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे .त्यांच्या समवेत उबाठा शिवसेना पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांची उपस्थिती होती .