समुद्रपूर: समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालय, येथे मोतीबिंदू विरहित शिबिर कार्यक्रमाचे आयोजन
समुद्रपूर येथे ग्रामीण रुग्णालय मध्ये निरामय अभियान" अंतर्गत मोतीबिंदू विरहित समुद्रपूर अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये समुद्रपूर परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला व विविध आरोग्य तपासण्या, विशेषतः डोळ्यांशी संबंधित तपासण्या आज मोफत करून घेतल्या.