वैजापूर: कापूसवाडगाव येथे आमदार बोरनारे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिजन सोहळा संपन्न
मौजे "कापूसवाडगाव" येथे आमदार प्रा.रमेश पा.बोरनारे सर यांनी विशेष प्रयत्न करून "90 लाख रुपये निधी" मंजूर आणलेल्या कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये लाडगाव ते कापूसवाडगाव डांबरीकरण भूमिपूजन 40 लाख रुपये,ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम भूमिपूजन 25 लाख रुपये,तांडा धनगर वस्ती सिमेंट रस्ता भूमिपूजन 15 लाख रुपये,कापूसवाडगाव ते पाट रस्ता खडीकरण भूमिपूजन 10 लाख रुपये असे एकूण "90 लाख रुपये निधी या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.