मलकापूर: पिंप्री गवळी येथे लोखंडी गेट अंगावर पडल्यामुळे बालिकेचा मृत्यू
पिंप्री गवळी येथील पुंडलिक नरवाडे यांच्या घरासमोर गेट बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले होते. फक्त गेटच्या दोन्ही बाजूंनी गेट बाहेर जाऊ नये म्हणून गेटच्या दोन्ही बाजुंनी अडथळा लावण्याचे काम बाकी होते. १५ ऑक्टोबर रोजी अंधार पडल्यामुळे हे काम दुसऱ्या दिवशी करण्याचे ठरले होते. दुसऱ्या दिवशी १६ ऑक्टोबर रोजी पुंडलिक नरवाडे यांची नात कुमारी ऋतुजा भीमराव नरवाडे ही गेट ओढून खेळत असतांना ऋतुजाच्या अंगावर गेट पडले.