नेवासा: पंचायत समितीच्या १४ गणांचे आरक्षण जाहीर
नेवासा पंचायत समितीच्या १४ गणांचे आरक्षण सोमवारी तहसील कार्यालयात काढण्यात आले. भेंडा, चांदा, खरवंडी, घोडेगाव हे गण सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहे. या गणांमध्ये चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. सदरचे गणांचे आरक्षण काहींना सोयीचे, तर काहींना अडचणीचे ठरले आहे.