उदगीर: बोगस गुंठेवारी विरोधात बहुजन विकास अभियानाचे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंध सत्याग्रह
Udgir, Latur | Nov 3, 2025 उदगीर नगरपालिकेला अंधारात ठेवून १९ बोगस गुंठेवारीचे प्रमाणपत्र देणाऱ्यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, समिती नेमून चौकशी होईपर्यंत गुंठेवारी कोणती आणि बोगस गुंठेवारी प्रमाणपत्र कोणते याची शहानिशा प्रशासनाने करावी या मागणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन विकास अभियानाच्या वतीने डोळ्यावर काळी पट्टी बांधून अंध सत्याग्रह करण्यात आले यावेळी अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते