पुणे शहर: शनिवारवाड्याच्या आवारात नमाजपठण केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune City, Pune | Oct 21, 2025 शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याच्या प्रकरणी तीन महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही तक्रार पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखल केली असून, त्यांनी सांगितले की या महिला मनाई असलेल्या ठिकाणी चटई अंथरून नमाज पठण करत होत्या. प्रकरणाची नोंद ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व अवशेष कायदा’ अंतर्गत करण्यात आली