सेलू: कुख्यात गुंड नरेश मोहिते दोन महिन्यांसाठी तडीपार; दहेगाव (गोसावी) पोलिसांची कारवाई
Seloo, Wardha | Dec 22, 2025 दहेगाव (गोसावी) पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी नरेश व्यंकटराव मोहिते (वय 38, रा. देऊळगाव, ता. सेलू, जि. वर्धा) यास दोन महिन्यांसाठी वर्धा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याला ता. 22 सोमवारला दुपारी 2 वाजता नागपूर जिल्ह्यात सोडण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. मोहिते याच्यावर दहेगाव, सेवाग्राम, वर्धा शहर, सेलू आदी पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.