महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) परिसरात असलेल्या स्टोन क्रेशर उद्योगांकडून पर्यावरण नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याच्या निषेधार्थ परिसरातील संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. आज, सोमवार, दिनांक ८ डिसेंबर २०२५ पासून या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली असून, मागण्या पूर्ण न झाल्यास 'आत्मकलेश' (आत्मत्याग) आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.