हिंगणघाट: कंटेनरमधून जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कलोडे चौकात कारवाई:२५ म्हैशीला दिले जिवदान
हिंगणघाट परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करीता पेट्रोलिंग करीत पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कलोडे चौकात सापडा रचून कंटेनर क्रमांक आर.जे.10 जीबी 7789 ची पाहणी केली असता कंटेनर मध्ये २५ म्हैस जातीचे नर (रेडे) कोंबुन त्यांची चाऱ्यापाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने भरून कत्तलीकरिता अवैधरित्या वाहतुक करून घेऊन जातांना निदर्शनास आले.यावेळी पोलिसांनी आरोपींना अटक करून ५० लाखाचा मुद्देमाल जप्त केला.