चाळीसगाव: दिवाळीच्या तोंडावर चाळीसगाव तहसील कार्यालयाची लगबग; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा
चाळीसगाव: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुदानाचा शासन निर्णय (GR) आज (शनिवार) प्राप्त झाल्यानंतर दिवाळीची सुट्टी आणि शनिवार असूनही चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.