तळा: खांबवली येथील २८ वर्षीय तरुण दीड महिन्यांपासून पौड येथून बेपत्ता
Tala, Raigad | Aug 25, 2024 तळा तालुक्यातील मौजे खांबवली येथील महेश विष्णू हिलम (वय २८) हां गेल्या दीड महिन्यापासून पौड येथून बेपत्ता आहे. दि. ९ जुलै रोजी महेश विष्णू हिलम हा सुनिल जाधव उर्फ प्रकाश यांच्यासोबत पुणे शहरातील पौंड येथे लांवणीच्या कामासाठी गेला होता. तेथे त्याची तब्बेत ठीक वाटतनसल्याने तो १० जुलै रोजी घरी न येत असल्याचे सुनिल जाधव याने त्याच्या घरी फोन करून - सांगितले. मात्र, त्या दिवशी तो घरी परतला नाही. म्हणून दुसऱ्यादिवशी महेश हिलमेच्या घरच्यांनी पुणे येथे दोन दिवस महेशचा शोध घेतला.