घनसावंगी: राजा टाकळी येथे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लाल बावटा शेतमजूर युनियनचे साखळी उपोषण सुरू
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या गोदावरी नदीच्या पूरामुळे राजा टाकळी परिसरातील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना सरकारकडून केवळ 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असली तरी ही मदत अत्यंत अपुरी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी तसेच प्रति कुटुंब किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.