भंडारा तालुक्यातील अर्जुनी पुनर्वसन गिरोला-पवनी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात बाप-लेक जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भंडारा येथील सुभाष वार्ड रहिवासी दीपक अरुणराव निनावे (५२) व त्यांचा मुलगा अनिकेत दीपकराव निनावे (२७) हे दोघे आपल्या एम.एच. ४० सी.जे. ६००७ क्रमांकाच्या यामाहा दुचाकीने पहेला येथे दुकानाच्या कामासाठी जात होते; दरम्यान, समोरून येणाऱ्या आर.जे. २९ एस.एक्स. ४१९४ क्रमांकाच्या भरधाव दुचाकी चालकाने...