अहेरी: चेअरपली येथे पाण्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन... रस्ता बनवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चेरपल्ली रस्त्याचे दुरावस्था झाली असून ठीक ठिकाणी मोठ मोठे जीवघेणे खड्डे पडून त्यांचे पाण्याचे डबक्याचे रूपांतर झाले असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच गावातील गरोदर महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन करून मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नवीन रस्ता तत्काळ बनविण्यात यावे म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.