वाशिम: शिव पांदण रस्ते विषयक मोहिमेला शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा! आमदार भावना गवळी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
Washim, Washim | Sep 14, 2025 महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक व लोकाभिमुख कार्यप्रणालीचा भाग म्हणून नकाशावर असणारे व नकाशावर नसणारे अशा दोन्ही प्रकारच्या पांदण रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत ही मोहिम राबविली जाणार आहे. या अंतर्गत पाणंद गाव रस्त्यांचे सविस्तर नकाशे तयार करून नागरिकांना तसेच ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.