महादुला येथे सर्पमित्राची वाट न बघता मन्यार या जहाल विषारी सापाला पकडून सुरेश ढोके यांनी बोरीत भरले होते. सापाला बोरीत भरत असताना या विषारी सापाने सुरेश यांच्या बोटाला चावा घेतला होता. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सुरेश दारूच्या नशेत असल्याचे म्हटले जात आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायला म्हटले असता त्यांनी उपचार घेण्यास नकारही दिला होता. दरम्यान त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.