बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अमानुष अत्याचाराचे पडसाद आज उपराजधानीत उमटले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल च्या वतीने आज व्हेरायटी चौक येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले. आंदोलक अधिक आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली.