धुळे शहरातील शनि मंदिर परिसरातील भांड्यांच्या दुकानात झालेली घरफोडी आझादनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उघडकीस आणली. सीसीटीव्हीच्या आधारे सद्दाम ऊर्फ बोबड्या रशिद शेख याला चाळीसगाव चौफुली येथे अटक करण्यात आली. त्याच्याकडून ७० हजार ७०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व गुन्हे शोध पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.