कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याचा निर्णय घेत बांगलादेश सरकारने भारतातून होणाऱ्या कांदा आयातीला परवाने मोठ्या प्रमाणात वाढविले आहे त्याचा थेट फायदा नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातीला होईल विशेषता लासलगाव पिंपळगाव निफाड परिसरातील कांद्याला परदेशी बाजारपेठ पुन्हा खुली झाल्याने निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे