राहुरी: तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात विधवा तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील एका गावामध्ये ३० वर्षीय विधवा तरुणीच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.घटनेतील आरोपी नामे राजेंद्र बबन शेळके राहणार, लाख तालुका राहुरी यास पोलिसांनी ताबडतोब अटक केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज रविवारी दुपारी दिली आहे.