रामटेक: कामगार कल्याण मंडळ रामटेक येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 15, 2025 बुधवार दिनांक 15 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक अंतर्गत कामगार कल्याण मंडळ कार्यालय रामटेक येथे सहाय्यक कल्याण आयुक्त सौ प्रतिभा भाकरे नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कामगार कुटुंबीय मुलांना पुस्तक वितरित करण्यात आले.