मेहकर: स्केटिंग स्पर्धेमध्ये दे.माळी येथील वरद भराड यांची विभागीय स्तरावर निवड
नुकत्याच बुलढाणा येथे पार पडलेल्या स्केटिंग स्पर्धेमध्ये देऊळगाव माळी येथील सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकर चा विद्यार्थी व्रत प्रवीण कुमार भराड याची अंडर इलेव्हन स्केटिंग स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक प्राप्त करून विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. तो इयत्ता चौथी मध्ये शिकत असून, त्याला शाळेतील शिक्षक तसेच हिवरा आश्रम येथील शिक्षक लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.