कुही: कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ येथे सोयाबीन बाजाराचा शुभारंभ
Kuhi, Nagpur | Oct 10, 2025 तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ येथे सोयाबीन बाजाराचा शुभारंभ मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. याबाबत चे वृत्त असे की शेतकऱ्यांचा सोयाबीन पीक निघायला सुरुवात झाली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ येथे सोयाबीन बाजाराचा शुभारंभ सभापती मनोज तितरमारे, उपसभापती महादेव जिभकाटे व संचालक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकरी, दलाल,व्यापारी यांचा सत्कार करण्यात आला.