जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या पंधरा दिवसांत अत्यंत गंभीर स्वरूपाचे तीन दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणत दरोडेखोरांच्या टोळीला मोठा झटका दिला आहे. चाळीसगाव ते कन्नड रोडवर नुकत्याच झालेल्या दरोड्याचा शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता तपास करत असताना ही मोठी कामगिरी झाली.