घनसावंगी: मूर्ती येथ विजेच्या शोर्ट सर्किट होऊन दहा एकर ऊस जळून खाक
घनसावंगी तालुक्यातील मूर्ती गावात शनिवारी दुपारी साडे तीन वाजता विजेच्या मुख्य लाईनच्या तारांचा शॉर्ट सर्किट झाल्याने गट नंबर १९१ शिवारातील शेतकरी शिदराम विश्वनाथ वडले यांच्या १० एकर ऊसाचे भीषण नुकसान झाले. अचानक विजेच्या तारातून ठिणग्या शेतातील उसावर पडल्याने अवघ्या काही मिनिटांत आगीने जोर धरला आणि सर्व ऊस जळून खाक झाला.घटनेच्या वेळी ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचे नियंत्राण येईपर्यंत संपूर्ण उन्हाळा-जाणार ऊस भस्मसात झाला.