पाचोरा: तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानका जवळ रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३५३ / १२ नजीक आज बुधवार दि. ६ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेतून पडल्याने एका ५० ते ५५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. ह. लक्ष्मण पवार करीत आहेत.