नवी मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकामांवरील वायू प्रदूषण नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याप्रमाणेच हिवाळी कालावधीत हवेत धुक्याबरोबरच धूळीचेही वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन ठिकठिकाणी डीप क्लीनिंग मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण स्वच्छता विभाग धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी कृतीशील झालेला आहे. त्यासोबतच आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार सर्व विभाग कार्यालयांच्या स्तरावर सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या मार्गदर्शनानुसार अभियंते व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ अजय गडदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता अधिकारी यांची पथके कार्यान्वित करण्यात आली असून सखोल स्वच्छता मोहीमांप्रमाणेच धूळ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.