आदिवासी बहुल देवलापार क्षेत्रातील पिपरिया येथे संगीता गोपीचंद वगारे वय 42 वर्षे हिचा शेतात काम करीत असताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता पीडित परिवार हा रोजमजुरी करणारा असून गोपीचंद वगारे याला 3 मुली आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच आदिवासी गोवारी समाज नेते व गोवारी समाज अंमलबजावणी व सनियंत्रण समिती म.रा. (राज्यमंत्री दर्जा) चे अध्यक्ष कैलास राऊत यांनी रविवार दि. 18 जानेवारीला दुपारी मृतकाच्या परिवाराचे घरी जाऊन सांत्वना भेट दिली.