दारव्हा: एक महिन्यापूर्वी आत्महत्येचा इशारा देत सायखेड येथील शेतकऱ्यानी घेतला शेतात गळफास!
दारव्हा तालुक्यातील सायखेड येथील युवक आकाश शंकर देवकर (वय ३१) यांनी दि. १६ सप्टेंबरला सकाळी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. बागवाडी शिवारात असलेल्या गिट्टी क्रेशर तसेच सतत सुरू असणारी मालवाहतूक यामुळे शेती पिकाचे होत असलेले नुकसानाला कंटाळून मंगळवारला सकाळी शेतातील झाडाला गळफास घेतला.