अंतरगाव येथे सोमवार, दि. २६ जानेवारी रोजी रथसप्तमीच्या पावन पर्वानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक दिंडी व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ११.३० वाजता श्री हनुमान देवस्थान येथून श्री मारुतीरायांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. टाळ-मृदंगांच्या गजरात, भगवे पताकांनी सजलेल्या पालखीचे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी उत्साहाने सहभाग घेतला. सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.