खुलताबाद: बाजारसावंगी येथील हरिनाम सप्ताहात भक्तांचा महासागर; ह.भ.प. युवराज काका देशमुखांच्या कीर्तनाने रंगली भक्तीमय मैफल!
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ह.भ.प. युवराज काका देशमुख यांच्या कीर्तनाने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले.सप्ताहाचा आज तिसरा दिवस असून गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.कीर्तन, भजन आणि नामस्मरणाच्या कार्यक्रमांनी परिसर दुमदुमला आहे.महिला, पुरुष आणि लहान मुले मोठ्या श्रद्धेने सप्ताहात सहभागी होत आहेत