भुसावळ: सेंट ऑलायसिस शाळेच्या निषेधार्थ भुसावळमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
भुसावळातील सेंट ऑलायसिस स्कूल आयोजित धार्मिक स्थळांच्या शैक्षणिक सहलीवरून वाद निर्माण झाला होता. विद्यार्थिनींना हिजाब सारखे स्कार्फ बांधून विशिष्ट धार्मिक स्थळी नेण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत १६ सप्टेंबर रोजी सेंट ऑलायसिस स्कूलविरोधात मोर्चा काढला.