चंद्रपूर: वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे पाय खोलात ! ट्रकचालकाकडून ५० हजार...
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) राकेश जाधव यांनी अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकचालकाकडून ५० हजार रुपये रोख रक्कम घेतल्याचा उल्लेख चौकशी अहवालात आहे. पोलीस अधीक्षकांनी हा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.