चंद्रपूर: खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची चंद्रपूर येथील स्थानिक विश्रामगृहात प्राथमिक बैठक
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला गती दिली आहे. याच अनुषंगाने आज चंद्रपूर येथील विश्रामगृह येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची प्राथमिक बैठक पार पडली. ही बैठक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.