कोरपना: घरचांदूर लखमापूर सिमेंट रोड चिखलमय अपघाताची मालिका लखमापूरचे माजी उपसरपंच मोरेश्वर अस्वले संतापले
कोरपणा लखमापूर येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या मराठा लाईन स्टोन खाणीतून सुरू असलेले ओव्हरलोड वाहतूक भर पावसात अपघाताचे कारण ठरत आहेत गडचांदूर लखमापूर माईन पर्यंत सिमेंट काँक्रेट रोड चिखलमय झाल्याने वाहने घसरून रोज अपघात होत आहेत विद्यार्थ्यासह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून कंपनी आणि बांधकाम विभागाकडून सरळ सरळ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप 14 सप्टेंबर रोज रविवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान स्थानिक लखमापूर येथील माजी उपसरपंच मोरेश्वर अस्वले यांनी केला आहे.